शिवाजी पार्कचं नामांतर शिवतीर्थ करा :शिवसेना

December 10, 2012 9:42 AM0 commentsViews: 8

10 डिसेंबर

शिवाजी पार्कला शिवतीर्थ हे नाव देण्यात यावं असा प्रस्ताव आज मुंबई महापालिकेच्या स्थायी समितीत चर्चेला येणार आहे. शिवसेना हा प्रस्ताव मांडणार आहेत. पण स्थायी समितीच्या बैठकीमध्ये काँग्रेस आणि मनसे हे दोघेही या प्रस्तावाला विरोध करणार आहेत. विकासाच्या मुद्द्यावर मनसे या प्रस्तावाला विरोध करणार असल्याचं मनसेचे गटनेते दिलीप लांडे यांनी स्पष्ट केलंय. तर याबरोबरचं बाळासाहेबांवरील एक धडा शालेय अभ्यासक्रमात समाविष्ट करण्यात यावा अशी सूचनाही या प्रस्तावात करण्यात येणार असल्याचं कळतंय. त्यामुळे एकूणच शिवतीर्थ बाळासाहेबांवरील धडा आणि स्मारक अशा वेगवेगळ्या विषयांवरून स्थायी समितीत खडाजंगी होईल अशीच शक्यता आहे.

close