लातुरात आयुक्तांची बदली रद्द करण्यासाठी सर्वपक्षीयांचा बंद

December 15, 2012 2:18 PM0 commentsViews: 6

15 डिसेंबर

लातूर महापालिकेचे आयुक्त रूचेश जैवंशी यांची बदली रद्द करण्यासाठी लातूरमध्ये आज सर्वपक्षीय बंद पाळण्यात आला. रूचेश यांची गडचिरोलीला बदली करण्यात आली आहे. आयुक्तांनी पदभार स्वीकारल्यापासून शहरात सुधारणांचा आणि कामाचा धडाका लावला होता. या कामांमुळे लोकही त्यांच्यावर खुश होते. त्यामुळे आयुक्त जैवंशी यांची बदली रद्द करा अशी मागणी नागरिकांनी केली.

close