पाणीटंचाईग्रस्त मनमाडकरांकडून नगरपालिकेत तोडफोड

December 18, 2012 8:10 AM0 commentsViews: 3

18 डिसेंबर

मनमाडमध्ये पाणीटंचाईनं संतप्त झालेल्या महिलांनी नगरपालिकेच्या कार्यालयाची तोडफोड केली. शहराला पाणीपुरवठा करणार्‍या वाघदर्डी धरणातलं पाणी संपलंय. त्यामुळे मनमाडला सध्या 15 दिवसांनी पाणीपुरवठा होतो. त्यात हे पाणीही अनियमित येत असल्यानं नागरिकांमध्ये संताप आहे. याचा निषेध करण्यासाठी मनमाडमध्ये महिलांनी हंडामोर्चा काढला. शिवाय नगरपालिकेच्या कार्यालयाची तोडफोडही करण्यात आली.

close