शिवसेना पुन्हा आणणार अविश्वास प्रस्ताव

December 13, 2012 9:54 AM0 commentsViews: 23

13 डिसेंबर

हिवाळी अधिवेशनात हसू झाल्यानंतर शिवसेना पुन्हा एकदा अविश्वास प्रस्ताव आणण्याच्या तयारीत आहे. यावेळी शिवसेना आणि भाजप मिळून अविश्वास प्रस्ताव मांडणार असल्याचं सुभाष देसाई यांनी सांगितलंय. तसंच मनसेचं नाव न घेता इतर विरोधकांनाही अविश्वास प्रस्तावाला पाठिंबा देण्यासाठी तयार करण्याचे प्रयत्न करणार असल्याचं त्यांनी सांगितलं. बुधवारी अधिवेशनात आघाडी सरकार विरोधात दाखल केलेल्या अविश्वास प्रस्ताव विधानसभा अध्यक्षांनी रद्द केला. तांत्रिक कारणामुळे हा प्रस्ताव रद्द करण्यात आल्याचं विधानसभा अध्यक्षांनी सांगितलं. पण यावरुन विरोधकांमध्येच एकजूट नव्हती. मनसे आणि भाजपनं शिवसेनेच्या या अविश्वास प्रस्तावाला विरोध केला होता. आता पुन्हा एकदा सादर केला जात आहे.

close