शिवडीत महिलेवर कोयत्याने वार, हल्लेखोराला अटक

December 21, 2012 12:23 PM0 commentsViews: 9

21 डिसेंबर

दिल्लीत एका तरुणीवर झालेल्या बलात्काराची घटना ताजी असतानाच गुरूवारी मुंबईत एका महिलेवर दारुच्या नशेत एका क्रुरकर्म्याने हल्ला केल्याची घटना घडलीय. शिवडी इथल्या एका चाळीत ही घटना घडलीये. प्रिती जैयस्वाल ही महिला आपल्या पतीसोबत निघाली असताना आरोपी विलास चोरघे हा रस्त्यातच उभा असल्यानं त्याला तिनं बाजूला होण्यास सांगितलं. त्यानंतर चिडलेल्या विलासनं कोयत्यानं या महिलेच्या गालावर आणि हातावर वार केले. त्याआधीही विलासनं दोन महिलांवर हल्ल्याचा प्रयत्न केला. या जखमी महिलेला तातडीनं हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं तिची प्रकृती आता सुधारलीये. दरम्यान, विलासनं पोलिसांवरही हल्ला केला, पण त्याला पोलिसांनी ताब्यात घेतलं.

close