पुण्यात इमारतीचा स्लॅब कोसळून 13 जणांचा मृत्यू

December 18, 2012 11:39 AM0 commentsViews: 4

18 डिसेंबर

पुण्यात नगर-पुणे रोडवर वाघोली इथं आज दुपारी 2 वाजता आयुर्वेद महाविद्यालयाच्या जवळील इमारतीचं बांधकाम सुरू असताना स्लॅब कोसळून 13 जणांचा मृत्यू झालाय. भारतीय आयुर्वेदिक कॉलेजच्या आयुर्वेदिक संस्थेच्या कॅन्सर हॉस्पिटलच्या इमारतीचं बांधकाम सुरू होतं. इमरतीच्या चौथ्या मजल्यावर बांधकाम सुरु होतं. यावेळी हा स्लॅब कोसळला. दुर्देवाने या दुर्घटनेत ढिगाराखाली 13 जणांचा जागीच मृत्यू झाला. यातून कोणालाही वाचवण्यात अग्निशमन दलाला यश आले नाही. पुण्याजवळील वाघोलीमध्ये पंचकर्मा हॉस्पिटलचे बांधकाम सुरु होते. या इमारतीच्या चार मजल्यांचे बांधकाम पूर्ण झाले होते. या इमारतीच्या डोमचे बांधकाम सकाळी सुरू झाले. दुपारपर्यंत सर्व काम पूर्ण होतं आलं होतं. पण अचानक स्लॅब कोसळला. या स्लॅबवर जवळपास बारा मजूर स्लॅबबरोबर खाली कोसळले. स्लॅबवर टाकण्यात आलेले सेंट्रिंगचे पाईप,फळ्या,लोखंडी सळई आणि त्यावर ओले सिंमेट टाकण्यात आलं होतं. स्लॅबच्या ढिगाराखाली सापडल्यामुळे 13 मंजूरांचा जागीच मृत्यू झाला. गेल्या वर्षभरापासून या हॉस्पिटलचे बांधकाम सुरू होते. शेवटच्या टप्प्यात इमारतीचे बांधकाम सुरू असताना आज ही दुर्घटना घडली. मृतांमध्ये सर्व मजूर हे बिहार, कर्नाटक, मध्यप्रदेश येथील रहिवासी आहे. दुर्घटनेच्या पूर्ण चौकशीनंतर गुन्हा दाखल करण्याचा निर्णय ट्रस्टने घेतला आहे.

close