राष्ट्रवादीच्या सत्यपत्रिकेवर भाजपची ‘घाव’पत्रिका

December 13, 2012 9:59 AM0 commentsViews: 6

13 डिसेंबर

विरोधकांच्या काळ्या पत्रिकेला उत्तर देण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसनं आज सत्यपत्रिका प्रसिद्ध केली. या पत्रिकेतून सिंचनाचं सत्य मांडल्याचा दावा राष्ट्रावादी काँग्रेसनं केला. गृहमंत्री आर.आर.पाटील आणि राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष मधुकर पिचड यांनी भाजपवर जोरदार टीका केली. सिंचनावर 70 हजार कोटी नाही तर 30 हजार कोटींचा खर्च केल्याचा दावा या सत्यपत्रिकेत करण्यात आलाय. भाजपनं काळ्या पत्रिकेतून चुकीची माहिती दिल्यानं भाजपनं माफी मागावी अशी मागणी राष्ट्रवादीनं केली. तसंच गरज पडली तर विरोधकांवर बदनामीचा खटला भरण्याचा इशारा आर.आर पाटील यांनी दिला. तर राष्ट्रवादीच्या या सत्यपत्रिकेची कुणकुण लागताच भाजपनं राष्ट्रवादीच्या आधीच पत्रकार परिषद घेत सत्यावर घाव अशी पत्रिका प्रसिद्ध करुन राष्ट्रवादीचे दावे फेटाळलेत. दरम्यान, सिंचन घोटाळ्याची एसआयटीमार्फत चौकशी करण्याची मागणी करत विरोधकांनी गदारोळ केला. त्यामुळे चौथ्या दिवशीही विधानसभा दिवसभरासाठी तहकूब करण्यात आली.

close