टीम इंडियाची रडारडी सुरूच, पहिली इनिंग 87 वर 4 विकेट

December 14, 2012 1:02 PM0 commentsViews: 6

14 डिसेंबर

मुंबई, कोलकाता आणि आता नागपूर टेस्ट भारतीय टीमची हाराकीरी सुरुच आहे. आज टेस्टच्या पहिल्या इनिंगमध्ये भारताचे दिग्गज बॅट्समन पुन्हा एकदा फ्लॉप ठरले आहे. भारताची 87 रन्सवर 4 विकेट अशी अवस्था झाली असून पहिल्या इनिंगमध्ये भारत तब्बल 243 रन्सनं पिछाडीवर आहे. वीरेंद्र सेहवाग, गौतम गंभीर, चेतेश्वर पुजारा आणि सचिन तेंडुलकर हे प्रमुख बॅट्समन झटपट आऊट झाले. त्याआधी तळाच्या बॅट्समननं केलेल्या झुंजार बॅटिंगच्या जोरावर इंग्लंडनं पहिल्या इनिंगमध्ये 330 रन्स केले. जो रुट, मॅट प्रायर आणि ग्रॅमी स्वाननं हाफसेंच्युरी ठोकत इंग्लंडला समाधानकारक स्कोर उभा करुन दिला. भारतातर्फे पियुष चावलानं सर्वाधिक 4 विकेट घेतल्या. तर ईशांत शर्माला 3 विकेट घेण्यात यश आलं.

close