दिल्ली गँगरेप प्रकरणातील आरोपींना फाशी द्या -गृहमंत्री

December 21, 2012 1:21 PM0 commentsViews: 5

21 डिसेंबर

दिल्लीतील सामूहिक बलात्कार प्रकरणातल्या आरोपींना फाशीची शिक्षा करण्यात यावी अशी शिफारस केंद्र सरकारकडे करणार असल्याची माहिती राज्याचे गृहमंत्री आर.आर.पाटील यांनी विधानसभेत दिली. दिल्लीमध्ये झालेलं चालत्या बसमध्ये एका तरूणीवर सामूहिक बलात्कार प्रकरण आणि राज्यात मुंबईत दादर,शिवडीमध्ये महिलेवर कोयत्याने हल्ला त्याचबरोबर राज्यभरात महिलांवर वाढत चाललेल्या अत्याचारांच्या प्रकरणानंतर, राज्य सरकारनं केंद्राकडे ही शिफारस केली आहे.

close