शिवाजी पार्कवरील चौथरा आज हटवला जाणार नाही

December 17, 2012 7:58 AM0 commentsViews: 3

17 डिसेंबर

शिवाजी पार्कमधल्या बाळासाहेब ठाकरे यांच्या समाधीस्थळाचा चौथरा हलवण्याचा शिवसेनेनं निर्णय घेतला होता. पण महापालिकेकडून शिवसेनेला पर्यायी जागा मिळाली नसल्यानं आज चौथरा हलवला जाणार नाही असे संकेत शिवसेनेने दिलेत. पर्यायी जागा मिळाल्यानंतरच चौथरा हलवला जाईल अशी शिवसेनेतल्या काही नेत्यांनी भूमिका मांडली आहे. यासंदर्भात आज शिवसेनेच्या ज्येष्ठ नेत्यांची शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरेंसोबत बैठक होण्याची शक्यता आहे.

दरम्यान, समाधीस्थळासाठी शिवसेनेनं 3 जागांची नावं दिली होती. पण पक्षातर्फे महापालिकेला पर्यायी जागांचा अधिकृत प्रस्ताव देण्यात आलेला नसल्यानं महापालिकेनं अजून जागा निश्चित केलेली नाही. मात्र सुरक्षेच्या कारणास्तव पोलिसांनीही शिवाजी पार्क येथे मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आलाय. 18 तारखेला शिवाजी पार्कमध्ये त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले होते. मुंबई महापालिकेनं शिवसेनेला फक्त 1 दिवसाची परवानगी दिली होती. पण तब्बल महिनाभर तो चौथरा हलवण्यात आला नव्हता. यावरून बरंच राजकारण रंगलं. पण मुख्यमंत्र्यांनी कडक भूमिका घेतल्यावर अखेर हा चौथरा हलवण्याचा निर्णय शिवसेनेनं घेतला होता पण आता स्मारकासाठी दुसरी जागा न मिळाल्यामुळे चौथरा हटवला जाणार नसल्याचं चित्र आहे.

close