लवकरच 6 ऐवजी 9 सिलिंडर मिळणार

December 11, 2012 2:04 PM0 commentsViews: 7

11 डिसेंबर

महागाईच्या खाईत होरपळणार्‍या सर्वसामान्यांना सरकारने दिलासा दिला आहे. केंद्र सरकारने सबसिडी दरात सिंलिडरवर घातलेली मर्यादा 6 वरून 9 करण्यात येणार असल्याची घोषणा पेट्रोलियम मंत्री विरप्पा मोईली यांनी केली आहे. सिलिंडरची मर्यादा वाढवण्यासाठी केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी आवश्यक आहे लवकरच हा प्रस्ताव मंत्रिमंडळात ठेवण्यात येणार असून त्याला मान्यताही मिळणार असा विश्वास मोईली यांनी व्यक्त केला. तसेच पेट्रोलियम कंपन्यांना 28 हजार 500 कोटींची सबसिडी देण्यात येणार आहे याबद्दल अर्थ मंत्री पी.चिंदबरम यांच्याशी बोलणी झाली असून प्रस्ताव तयार करण्यात आलाय असं मोईली यांनी सांगितलं. मात्र सिलेंडरच्या सबसिडीची मर्यादा वाढवण्याचे संकेत केंद्र सरकारने दिलेत खरे पण असा अजून निर्णय घेतला नसल्याचं अर्थमंत्रालयानं लगेच स्पष्ट केलंय. तर असा निर्णय घेतल्यास ते निवडणूक आचारसंहितेचं उल्लंघन ठरेल असा इशारा निवडणूक आयोगानं दिलाय. त्यामुळे सध्यातरी सिंलिडरच्या मर्यादा वाढीचा निर्णय गोठला गेला आहे.

close