नवी मुंबईत सागरी सुरक्षेत वाढ

December 18, 2012 12:57 PM0 commentsViews: 7

18 डिसेंबर

नवी मुंबईतून सागरी मार्गानं अतिरेकी घुसण्याचा ऍलर्ट आयबीनं दिल्यामुळे सागरी किनार्‍याच्या भागात सुरक्षाव्यवस्था वाढवण्यात आली आहे. 7 बोटी , 5 अधिकारी आणि 83 कर्मचारी यांचा 24 तास बंदोबस्त ठेवण्यात आला. सीसीटीव्ही आणि वायरलेसच्या माध्यमातून परिसरामध्ये नियंत्रण ठेवण्यात येत आहे. नवी मुंबईच्या कोस्टल झोनमधील 104 किलोमीटर अंतराच्या हद्दीमध्ये महत्वपूर्ण जागा असलेल्या जेएनपीटी, ओएनजीसी , बीएआरसी अशा ठिकाणीही अलर्ट घोषित करण्यात आलाय. सुरक्षेच्या दृष्टीकोनातून नवी मुंबई कोस्टल झोनमध्ये सागरी मार्गातून होणार्‍या हल्ल्यामुळे नवी मुंबई सागरी सुरक्षा दलाने तिन्ही झोन अलर्ट केलेत. मोरा आणि एन आरआय पोलीस ठाणे हे कोस्टलच्या अंतर्गत असून उलवे आणि बोकड वीरा हे चेक नाके तैनात करण्यात आले आहेत. त्यामुळे सुरक्षेच्या दृष्टीने नवी मुंबई सागरी सुरक्षादल अलर्ट झाले आहेत.

close