आबांनंतर कोण ? गुरुवारी ठरणार

December 4, 2008 5:14 AM0 commentsViews: 4

4 डिसेंबर, मुंबई राष्ट्रवादी काँग्रेसचा नेता निवडण्यासाठी आज बैठक होतेय. यावेळी निवडलेला नेता उपमुख्यमंत्री होईल. उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री कोणाला करायचं, यावरून राष्ट्रवादीच्या आमदारांमध्ये मतभेद झाले. त्यामुळे आता हा निर्णय शरद पवारांवर सोपवण्यात आलाय. आर आर पाटील यांच्या उत्तराधिकार्‍याचं नाव आज जाहीर होण्याची शक्यता आहे. काँग्रेसनं मुख्यमंत्री जाहीर केल्यावर राष्ट्रवादीकडून उपमुख्यमंत्र्याचं नाव घोषित केलं जाण्याची शक्यता आहे. उपमुख्यमंत्रीपदासाठी छगन भुजबळ यांचं नाव चर्चेत आहे. पण गृहमंत्रीपद दुसर्‍या कुणाकडं तरी जाण्याचा अंदाज व्यक्त केला जातोय.

close