बीडीडी चाळींच्या पुनर्विकासाचा मार्ग मोकळा

December 13, 2012 10:37 AM0 commentsViews: 6

13 डिसेंबर

हेरिटेजच्या यादीतून बीडीडी चाळ वगळणार असल्याचं आश्वासन सरकारनं दिल्यानं आता या इमारतींच्या पुनर्विकासाचा मार्ग मोकळा झाला आहे. यामुळे बीडीडी चाळीत रहाणार्‍यांनी आता सुटकेचा निश्वास सोडला आहे. मुंबई पुरातन वारसा जतन समितीने हेरिटेज वास्तूंच्या यादीत बीडीडी चाळीचा समावेश केला आहे. तसंच बीडीडी चाळीच्या पुनर्विकासाचे धोरण येत्या महिनाभरात तयार करण्यात येईल अशी माहिती गृहनिर्माण राज्यमंत्री सचिन अहिर यांनी काल विधान परिषदेत दिली.

93 एकर जागा

मुंबईच्या मध्यावर असलेल्या 93 एकर जमिनीवर शिवडी, वरळी, ना.म. जोशी मार्ग आणि नायगाव या भागात 1924मध्ये 207 बीडीडी चाळी उभारण्यात आल्या. यात जवळपास 16 हजार 213 भाडेकरु राहतात. तर 332 दुकानेही आहेत.

close