कलमाडींसह 11 जणांविरुद्ध आरोप निश्चित करा : कोर्ट

December 21, 2012 1:29 PM0 commentsViews: 4

21 डिसेंबर

कॉमनवेल्थ घोटाळाप्रकरणी सुरेश कलमाडींना दिल्ली कोर्टानं धक्का दिलाय. कलमाडींसह 11 जणांविरुद्ध 10 जानेवारीपर्यंत आरोप निश्चित करण्याचे आदेश कोर्टानं सीबीआयला दिले आहेत. कॉमनवेल्थ गेम्स दरम्यान कंत्राट देताना गैरप्रकार केल्याचा आरोप सुरेश कलमाडी, ललित भानोत यांच्यासह 11 जणांवर ठेवण्यात आला आहे. लिलाव प्रक्रिया संपण्याआधीच काही कंत्राट दिले गेल्याची माहिती सीबीआयने कोर्टात दिलीये. या सगळ्यांविरोधात कट रचणे, फसणूक करणे यासारखे गंभीर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

close