जनावरांच्या चार्‍यावरही भ्रष्टाचार्‍यांचा डल्ला

December 11, 2012 3:03 PM0 commentsViews: 80

11 डिसेंबर

एकीकडे दुष्काळानं लोक हैराण झालेले असताना ग्रामीण भागात काहींनी भ्रष्टाचारासाठी जनावरांचा चाराही सोडलेला नाही. अहमदनगरच्या कर्जत तालुक्यात बारडगाव इथं एकनाथ पाटील ग्रामीण बहुद्देशीय संस्थेनं कोट्यावधी रुपयांचा चारा घोटाळा केला असल्याचं माहितीच्या अधिकारामुळे उघडकीस आला आहे.

जिल्ह्यात दुष्काळाची तीव्रता वाढल्यानंतर सरकारने जनावरांच्या छावण्या आणि चारा डेपो सुरू केले होते. पण अनेक ठिकाणी हे चारा डेपो प्रत्यक्षात सुरुच झाले नाहीत. ठेकेदार आणि अधिकार्‍यांनी संगनमत करुन कोट्यावधींच्या रक्कमा थातूरमातूर कागदपत्रं रंगवून हडप केल्या. माहितीच्या अधिकारात मिळालेल्या माहितीनुसार या संस्थेनं एका कायनेटिक कंपनीच्या लुनावर 20 टन चारा आणल्याचं दाखवलं. नगरमधील भाजपचे कार्यकर्ते अनिल शर्मा यांनी माहितीचा अधिकार वापरून हा घोटाळा उघडकीस आणलाय. तर चारा आणण्यासाठी राज्यभरातून टू व्हीलर, रिक्षा, फोर व्हीलरचा वापर करण्यात आल्याचं दाखवलंय. दरम्यान, या घोटाळ्याच्या चौकशीचे आदेश उपजिल्हाधिकारी गोरक्ष गाडिलकर यांनी दिले आहे.

close