शाहू महाराजांच्या स्मारकाला सरकारची तत्वत:मंजुरी

December 18, 2012 2:47 PM0 commentsViews: 124

18 डिसेंबर

कोल्हापुरमधल्या शाहू मिलच्या 27 एकर जागेवर राजर्षी शाहू महाराजांचं भव्य असे स्मारक उभारण्यास सरकारनं आज तत्वतः मंजुरी दिलीय. राजर्षी शाहू महाराजांनी या मिलची स्थापना केली होती. मात्र सराकरच्या अनास्थेमुळं ही मिल बंद पडली होती. 27 सप्टेंबर 1906 रोजी या मिलची सुरुवात झाली होती. मात्र 2003 साली या मिलचा अखेरचा भोंगा वाजला होता. त्यामुळं या बंद मिलच्या जागी शाहू महाराजांचं भव्य स्मारक व्हावं अशी तमाम शाहू प्रेमींची मागणी होती. यासाठी अनेक संघटना आणि राजकीय पक्षांनीही आंदोलन केली होती. त्याला अखेर यश आलंय. दरम्यान, सरकारच्या या निर्णयाचं कोल्हापुरवासियांनी स्वागत केलं असून ठिकठिकाणी साखर वाटून आनंद साजरा करण्यात आला.

close