मेळघाटच्या आदिवासींना वन जमिनींचे पट्टे वाटप

December 14, 2012 2:11 PM0 commentsViews: 4

14 डिसेंबर

अमरावतीतील अचलपूर तालुक्यात मेळघाटच्या आदिवासींना वन जमिनींचे पट्टे वाटप करण्यात आले आहेत. राज्यपाल के.शंकरनारायणन यांच्या हस्ते 43 गावातल्या 89 आदिवासींना वन जमिनींचे हक्क देण्यात आले. गेल्या अनेक वर्षांपासून मेळघाटचा आदिवासी वन जमिनींवर वास्तव्य करतो. अनेक वर्षांच्या संघर्षानंतर या आदिवासींना आपला हक्क मिळालाय. देशातील अनुसुचित जाती जमातींमधील घटकांचा शैक्षणिक, आर्थिक आणि सामाजिक विकास झाल्याशिवाय देशाचा विकास होणार नसल्याचं राज्यपाल शंकरनारायन यांनी नमूद केलं.

close