बढतीत आरक्षण विधेयकावरून राज्यसभेत गदारोळ

December 17, 2012 8:35 AM0 commentsViews: 1

17 डिसेंबर

एससी,एसटी बढतीमधील आरक्षण विधेयकावरून आज संसदेत जोरदार गदारोळ झाला. समाजवादी पक्षाचा या विधेयकाला विरोध आहे. त्यातच आज समाजवादी पार्टीनं सच्चर कमिटीच्या शिफारशीनुसार मुस्लिमांना कोटा मिळण्याची मागणी केली. त्यानंतर याच मुद्यावर गदारोळ झाला आणि दोन्ही सभागृहांचं कामकाज काही काळ तहकूब करण्यात आलं. आज दुपारी राज्यसभेत या विधेयकावर चर्चा होऊन मतदान होणार आहे.

close