‘ती’ पूर्णपणे शुद्धीवर पण प्रकृती चिंताजनक

December 23, 2012 3:04 PM0 commentsViews: 8

23 डिसेंबर

सामूहिक बलात्कार पीडित तरूणीची प्रकृती पुन्हा बिघडलीय. श्वसनाचा त्रास होऊ लागल्यामुळे तिला पुन्हा एकदा व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलंय. जवळपास दीड दिवस व्हेंटिलेटर काढण्यात आलं होतं. शनिवारी रात्री तिनं थोडं ज्युस घेतलं होतं. पण आज दुपारी तिला पुन्हा त्रास सुरू झाला. त्यामुळे पुन्हा एकदा व्हेंटिलेटर लावण्यात आलं. तिची प्रकृती गंभीर असली तरी ती सध्या पूर्णपणे शुद्धीवर आहे. सगळ्यांशी बोलतेय, अशी माहिती सफदरजंग हॉस्पिटलचे डॉ. बी. डी. अथानी यांनी दिलीय. पण तिच्या प्लेटलेट 41 हजारांहून 19 हजार इतक्या झपाट्यानं कमी झाल्या आहेत. तो ही एक काळजीची बाब आहे. तिच्या शरिरातलं इन्फेक्शन नियंत्रणात ठेवण्यासाठी तिला मोठ्या प्रमाणावर अँटिबायोटिक्स देण्यात येताहेत.

close