विनयभंग प्रकरणी दोन प्राध्यापकांची न्यायालयीन कोठडी

December 14, 2012 2:13 PM0 commentsViews: 3

14 डिसेंबर

मुंबई विद्यापीठाच्या दोन प्राध्यापकांना विनयभंग प्रकरणी न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात आलंय. प्रा. डी. एन चौगले आणि प्रा. निलेश लोहार अशी त्यांची नावं आहेत. या दोघांनी विनयभंग केल्याची तक्रार त्यांच्याच विभागातल्या 3 महिला सहकार्‍यांनी केली होती. त्यानंतर वांद्रे-कुर्ला पोलिसांनी त्यांना अटक केली होती. आज कोर्टासमोर दोघा प्राध्यपकांना हजर केले असता कोर्टाने दोघांना न्यायालयीन कोठडी ठोठावली आहे.

close