24 तासात अपहरत कांदा व्यापार्‍याची सुखरूप सुटका

December 21, 2012 2:33 PM0 commentsViews: 7

21 डिसेंबर

अपहरण करण्यात आलेल्या नाशिकमधल्या कांदा व्यापार्‍याची नाशिक आणि अहमदनगरच्या पोलिसांनी सुरक्षित सुटका केली आहेत. पिंपळगाव बसवंतचे कांदा व्यापारी शंकरलाल ठक्कर यांचं 15 कोटींच्या खंडणीसाठी अपहरण करण्यात आलं होतं. त्यानंतर नाशिक आणि अहमदनगरच्या पोलिसांनी सापळा रचून 8 आरोपींना 5 कोटींची खंडणीची रक्कम आणि घातक शस्त्रास्त्रांसह संगमनेरमधून अटक केली. आरोपींमध्ये सर्व 20 ते 25 वयोगटातले तरुण आहे. पोलिसांच्या या 24 तासातल्या कामगिरीबद्दल गृहमंत्री आर.आर.पाटील यांनी 1 लाख रुपयांचं बक्षीस जाहीर केलंय.

close