शिवाजी पार्कमध्ये गार्डन उभारण्याचा सेनेचा प्रस्ताव

December 18, 2012 4:42 PM0 commentsViews: 13

18 डिसेंबर

शिवाजी पार्कातला शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा चौथरा हटवल्यानंतर आता शिवाजी महाराजांच्या पुतळ्याशेजारी गार्डन उभारण्याचा प्रस्ताव समोर आला आहे. बांधकामरहित गार्डन बनवण्याच्या प्रस्तावाला गटनेत्यांच्या बैठकीत मंजुरी मिळालीय. ज्या ठिकाणी बाळासाहेबांवर अंत्यसंस्कार करण्यात आले त्या ठिकाणी चौथरा उभारण्यात आला होता त्याच ठिकाणी 20 X 40 फूटाच्या जागेत हे गार्डन उभारण्यात येणार आहे.सध्या शिवाजी पार्कबाबत कोर्टात खटला दाखल आहे त्यामुळे पालिकेचा प्रस्तावाविरोधात आव्हानही नाकारता येत नाही.महापालिकेचे आयुक्त सीताराम कुंटे, महापौर सुनील प्रभू, स्थायी समितीचे अध्यक्ष राहुल शेवाळे यांनी जागेची पाहणी केली. यावेळी शिवसैनिकही उपस्थित होते.

close