आंदोलनात जखमी झालेल्या कॉन्स्टेबलचा मृत्यू

December 25, 2012 9:04 AM0 commentsViews: 6

25 डिसेंबरदिल्लीत रविवारी इंडिया गेटवर झालेल्या आंदोलनादरम्यान दगडफेकीत जखमी झालेल्या पोलीस कॉन्स्टेबल सुभाष तोमर यांचा मृत्यू झालाय. राम मनोहर लोहिया हॉस्पिटलमध्ये उपचारादरम्यान त्यांच्या मृत्यू झालाय. याप्रकरणी 8 जणांना अटक करण्यात आली होती. पण त्यांची जामिनावर सुटका करण्यात आलीये. त्यांच्यापैकी एक जण आम आदमी पार्टीचा कार्यकर्ता आहे. मनिष सिसोदिया यांनी त्याला जामिनासाठी मदत केली आहे. दरम्यान, आता तोमर यांचा मृत्यू झाल्यानं या सगळ्यांना पुन्हा अटक होण्याची शक्यता आहे. तर योगगुरू बाबा रामदेव आणि माजी लष्करप्रमुख व्ही के सिंग यांच्याविरोधातही पोलिसांनी दंगल भडकवणे आणि सार्वजनिक मालमत्तेची तोडफोड करणे यासारखे गुन्हे दाखल केले आहेत.

close