गुजरातमध्ये पहिल्या टप्प्यात 67 टक्के मतदान

December 13, 2012 12:01 PM0 commentsViews: 5

13 डिसेंबर

गुजरात विधानसभेच्या पहिल्या टप्प्याचं मतदान संपलं असून मतदानाला चांगला प्रतिसाद मिळाला. 67 टक्के मतदान झालंय. आज 87 जागांसाठी 846 उमेदवार नशीब आजमावता आहेत. मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांनी सकाळीच ट्विटरवरून लोकांना मतदान करण्याचं आवाहन केलं होतं. नरेंद्र मोदींना आव्हान देत नवा पक्ष स्थापन केलेल्या केशुभाई पटेलांचं राजकीय भवितव्य या टप्प्यात पणाला लागलंय. सौराष्ट्र भागात लेवा पटेल समुदाय मोठ्या प्रमाणावर असल्यानं केशुभाईंचा गुजरात परिवर्तन पक्ष इथे मुसंडी मारेल अशी शक्यता राजकीय विश्लेषकांनी व्यक्त केलीय.

close