मोदींच्या रॅलीतून परतणार्‍या पोलिसांच्या व्हॅनला अपघात, 9 ठार

December 14, 2012 2:20 PM0 commentsViews: 3

14 डिसेंबर

गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदींच्या प्रचारसभेतून परतणार्‍या पोलिसांच्या व्हॅनला भीषण अपघात झालाय. या अपघातात नऊ पोलिसांचा मृत्यू झाला. गुजरातमधल्या दाहोडमध्ये नरेंद्र मोदींची रॅली होती. तिथून परतणार्‍या पोलिसांची व्हॅन एका विहिरीत कोसळली. बसच्या ड्रायव्हरला हार्ट अटॅक आल्यानं हा अपघात झाला. जखमींना नजीकच्या हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं आहे. नरेंद्र मोदी यांनी ट्वीटरद्वारे अपघातात मरण पावलेल्या पोलिसांना श्रद्धांजली वाहिली.

close