कोल्हापुरात दोन गटामध्ये वादातून गोळीबार

December 21, 2012 1:57 PM0 commentsViews: 3

21 डिसेंबर

कोल्हापूर शहरातल्या आदिती कॉर्नर परिसरात आज युवकांच्या 2 गटांमध्ये वादावादी झाली आणि त्यानंतर गोळीबाराचीही घटना घडलीय. दोन राजकीय घराण्यांमधल्या युवकांमधला हा वाद आहे. शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख रामभाऊ चव्हाण यांचा पुतण्या प्रसाद चव्हाणच्या गाडीवर संशयित आरोपी युद्धवीर गायकवाडनं गोळीबार केल्याचा संशय आहे. तर युद्धवीर हा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते मानसिंगराव गायकवाड यांचा मुलगा आहे. या गोळीबारात कुणीही जखमी झालेलं नाही. दरम्यान, या घटनेबाबात शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोन्ही राजकीय नेत्यांनी हा वाद परस्परांमधला असून तो मिटवला जाईल असं सांगितलंय.

close