भारत-पाक मॅचविरोधात शिवसेना आक्रमक

December 21, 2012 3:50 PM0 commentsViews: 6

21 डिसेंबर

एकीकडे आपल्या देशावर अतिरेकी हल्ले करायचे, आपल्या देशाची व्यवस्था खिळखिळी करण्याचा प्रयत्न करणाचा आणि एवढं होऊन सुद्धा पाकिस्तानच्या टीम सोबत भारतीय टीमने क्रिकेट खेळन योग्य नाही आम्ही अगोदरच या सामन्यांना विरोध केला होता आता मात्र जिथे कुठे मॅच होईल त्या ठिकाणी जाऊन शिवसैनिक विरोध करतील असा थेट इशारा शिवसेना नेते मनोहर जोशी यांनी दिलाय. 25 डिसेंबरपासून भारत पाकिस्तान दरम्यान दोन टी 20 आणि 3 वनडे मॅचची सीरिज सुरु होणार आहे. या सीरिजची घोषणा होताच शिवसेनेनं पाक टीमला महाराष्ट्रात पाय ठेवू देणार नाही असा इशारा दिला होता. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी या सामन्यांना कडाडून विरोध केला होता. यासंदर्भात शिवसेनेचं मुखपत्र सामनामधून बाळसाहेबांनी आपली भूमिका मांडली होती. सामनामधून बाळासाहेबांनी पाक टीमचा समाचार घेतलाच होता त्याचबरोबर भारतीय खेळांडूवर तोफ डागली होती. आता येत्या 25 डिसेंबर भारत-पाकिस्तानचे सामने महाराष्ट्र वगळून दिल्ली,कोलकत्ता आणि चेन्नईत भरवण्यात आले आहे. शिवसेनेच्या विरोधामुळे केंद्रीय गृहखात्यांने संरक्षणात वाढ केली आहे.

close