शीला दीक्षित आणि दिल्ली पोलिसांत मतभेद

December 25, 2012 10:03 AM0 commentsViews: 7

25 डिसेंबरदिल्ली सामूहिक बलात्कार प्रकरण आणि आंदोलकांवर झालेली कारवाई या प्रकरणावरुन दिल्ली पोलीस आणि मुख्यमंत्री शीला दीक्षित यांच्यातील मतभेद समोर आलेत. याप्रकरणी पोलिसांच्या तपासात दिरंगाई झाली का यावर चौकशीसाठी आता हायकोर्टाच्या माजी न्यायमूतीर्ंकडून चौकशी केली जाणार आहे. पीडित मुलीचा जबाब घेतांना वरिष्ठ पोलीस अधिकार्‍यांनी हस्तक्षेप केल्याचा आरोप शीला दीक्षित यांनी केलाय. तर पोलिसांच्या भूमिकेची चौकशी करा अशी मागणी करणारं पत्र शीला दीक्षित यांनी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांना पाठवलं होतं त्यानंतर ही कारवाई करण्यात आलीये.

close