बढतीत आरक्षण विधेयकावरून राज्यसभेत गदारोळ

December 13, 2012 12:07 PM0 commentsViews: 3

13 डिसेंबर

सरकारी नोकर्‍यांमधल्या बढतीत आरक्षण विधेयकावरून राज्यसभेत आज मोठा गदारोळ झाला. या गदारोळातच हे विधेयक राज्यसभेत मांडण्यात आलं. समाजवादी पक्षाचा या विधेयकाला तीव्र विरोध आहे. समाजवादी पक्षाच्या खासदारांनी घातलेल्या प्रचंड गदारोळामुळे उपसभापतींनी त्यांना चांगलंच खडसावलं. त्यानंतर या खासदारांनी सभात्याग केला. सरकारनं सादर केलेल्या या विधेयकाला बहुजन समाज पक्षाचा पाठिंबा आहे.या विधेयकात भाजपने काही दुरुस्ती सुचवल्या आहेत. उद्या आणि परवाच्या सुट्टीनंतर सोमवारी या विधेयकावर राज्यसभेत मतदान होण्याची शक्यता आहे. या विधेयकाचं कायद्यात रुपांतर होण्यासाठी याच अधिवेशनात ते लोकसभेनंही मंजूर करणं गरजेचं आहे. दरम्यान, बढतीत आरक्षण विधेयक राज्यसभेत सादर होताच उत्तर प्रदेशातले 18 लाख कर्मचारी आणि अधिकारी यांनी अचानक एक दिवसाचा लाक्षणिक बंद पुकारलाय.

close