‘आदर्श’ची जागा संरक्षण मंत्रालयाचीच’

December 14, 2012 4:29 PM0 commentsViews: 6

14 डिसेंबर

आदर्श हाऊसिंग सोसायटी घोटाळ्याप्रकरणी संरक्षण मंत्रालयानं मुंबई हायकोर्टात टायटल सूट दाखल केलंय. आदर्श इमारत ज्या भूखंडावर उभी आहे ती जागा संरक्षण मंत्रालयाची असल्याचं संरक्षण मंत्रालयाचं म्हणणं आहे. राज्य सरकारलाही संरक्षण मंत्रालयानं ही माहिती दिली होती. पण त्यानंतर अनेक महिन्यांनी कोर्टात टायटल सूट दाखल करण्यात आलंय. याप्रकरणी चौकशी करत असलेल्या न्यायालयीन समितीनं हा भूखंड राज्य सरकारच्या मालकीचा असल्याचा दावा केला होता.

close