गोव्यात 39व्या आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिव्हलची सांगता

December 4, 2008 8:53 AM0 commentsViews: 6

4 डिसेंबर, मुंबई मनिषा महालदार गोव्यात नुकत्याच झालेल्या 39व्या आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिवलची सांगता झाली. प्रमुख पाहुणा म्हणून अभिनेता कमल हसन उपस्थित होता. या फेस्टीवलच्या शेवटच्या दिवशी पोर्तुगाल-स्पेन फदोस या सिनेमाचं स्क्रिनिंगही करण्यात आलं. तसंच बेस्ट फिल्म ' द वॉल 'या सिनेमासाठी आणि दिग्दर्शक म्हणून पाँगपत वॉचिराबजाँग हिला 'खॉ है रॅक जोह्ग जॅरोन' या सिनेमासाठी पुरस्कारही देण्यात आला. यावेळी अनेक बॉलिवुडचे चेहरे दिसलेच पण त्या सोबत गोव्याचे मुख्यमंत्री दिगंबर कामत हजर होते. सोबत अनेक मान्यवरांनी या इफ्फी फिल्म फेस्टिव्हलला हजेरी लावली .

close