एकतर्फी प्रेमातून हल्ल्यातील जखमी पायल बलसाराचा मृत्यू

December 25, 2012 10:17 AM0 commentsViews: 127

25 डिसेंबरमुंबईत एकतर्फी प्रेम प्रकरणातून झालेल्या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या पायल बलसारा हीचा आज मृत्यू झाला. गुरूनानक हॉस्पिटलमध्ये गेल्या तीन दिवसांपासून मृत्यूशी झुंझ दिली मात्र आज तीने अखेरचा श्वास घेतला. तीच्याच वर्गातील निखिल बनकर या विद्यार्थ्याने शनिवारी पायलवर चॉपरने हल्ला केला होता. निखिलने हल्ला केल्यानंतर स्वत:वरही चॉपरने वार केले होते. यात त्याचा मृत्यू झाला. पायलवर उपचार सुरू असताना तीचाही मृत्यू झाला. हा हल्ला एकतर्फी प्रेमातून झाल्याचं पोलिसांकडून सांगण्यात येतंय.

close