नागपूर टेस्ट:इंग्लंड पहिल्या दिवशी 5 विकेटवर 199 धावा

December 13, 2012 12:31 PM0 commentsViews: 10

13 डिसेंबर

भारत आणि इंग्लंड दरम्यानच्या चौथ्या आणि शेवटच्या टेस्ट मॅचला आजपासून नागपूरमध्ये सुरुवात झाली. पण मॅचचा पहिला दिवस अतिशय संथ ठरला. पहिल्या दिवसात तब्बल 97 ओव्हर्सचा खेळ झाला. पण इंग्लंडला 200 रन्सचा टप्पाही पार करता आला नाही. तर भारतीय बॉलर्सना केवळ 5 विकेट घेता आल्या. या सीरिजमध्ये पहिल्यांदाच इंग्लंडचा कॅप्टन ऍलिस्टर कुकनं टॉस जिंकला आणि पहिली बॅटिंग घेतली. पण मॅचच्या पाचव्याच ओव्हरमध्ये ईशांत शर्मानं निक कॉम्प्टनला आऊट करत भारताला पहिलं यश मिळवून दिलं. तर या दौर्‍यात खोर्‍यानं रन्स करणार्‍या कुकलाही ईशांतनंच पॅव्हेलिअनचा रस्ता दाखवला. कुकला केवळ 1 रन करता आला. टेस्ट क्रिकेटमध्ये पदार्पण करणार्‍या रविंद्र जडेजानंही दोन विकेट घेण्यात यशस्वी ठरला. इंग्लंडतर्फे केविन पीटरसननं सर्वाधिक 73 रन्स केले.

पिच गारठली, खेळाडू बुचकळ्यात

नागपूर टेस्टच्या पहिला दिवशी संथ खेळ पाहिला मिळाला आणि याचं प्रमुख कारण ठरलंय ते नागपूरचं पिच..पीचवरून आता नवीन वाद सुरु होण्याची शक्यता आहे. पीच हे दुय्यम दर्जाचं असल्याची टीका सध्या होतेय. पीचवर बॉल जास्त उसळी घेत नाहीये त्यामुळे पहिल्या दिवशी इंग्लंडच्या बॅट्समनना याचा फटका बसलाय. त्यामुळे ऍलिस्टर कुकच्या इंग्लंड टीमचं सीरिज विजयाचं स्वप्नही धोक्यात येऊ शकतंय. या पीचवर स्ट्रोक्स बसत नाहीत आणि त्यामुळे झटपट रन्स होत नाहीयेत अशीही टीका केली जातेय आणि पुढील दोन दिवसात हे पीच अजूनही खराब होईल अशी शक्यता वर्तवली जातेय.

close