सीबीआयवर असतो सरकारचा दबाव -यू.एस.मिश्रा

December 14, 2012 5:11 PM0 commentsViews: 5

14 डिसेंबर

सीबीआयचे माजी संचालक यू. एस. मिश्रा यांच्या एका वक्तव्यामुळे मोठं वादळ उठलंय. सीबीआयवर सरकारचा दबाव असतो असा गंभीर आरोप मिश्रा यांनी आयबीएन नेटवर्कशी बोलताना केलाय. सीबीआय सरकारच्या नियंत्रणात असते, त्यामुळे सीबीआयला स्वतंत्र करायला हवं असं मिश्रा यांचं म्हणणंय. मायावतींवर आरोप असलेल्या ताज कॉरिडोर घोटाळ्याचा मिश्रा यांनी तपास केला होता. याप्रकरणी मायावतींची नुकतीच सुटका झालीय. मिश्रा यांच्या आरोपांनंतर विरोधकांनी पुन्हा एकदा सरकारवर टीका केलीय. पण केंद्र सरकारनं मिश्रांच्या आरोपांचं खंडन केलंय. सीबीआय स्वतंत्र संस्था असल्याचं स्पष्टीकरण केंद्र सरकारनं दिलंय.

close