लाज गेली, सीरिजही गमावली

December 17, 2012 10:22 AM0 commentsViews: 8

17 डिसेंबर

सलग दोन कसोटीत पराभव, टॉपच्या फलांदाजाचा खराब फॉर्म, गोलदांजाची उडालेली भंबेरीमुळे आपल्याच मायभूमीत टीम इंडियाला कसोटी सीरिज गमवावी लागली आहे. नागपूर टेस्ट मॅच अखेर ड्रॉ झाली आणि भारतीय टीमवर मायदेशातच सीरिज पराभवाची नामुष्की ओढावलीय चार मॅचची ही सीरिज इंग्लंडनं 2-1 अशी जिंकलीय. तब्बल 28 वर्षांनंतर इंग्लंडनं भारतात टेस्ट सीरिज जिंकण्याचा रेकॉर्ड केला आहे. नागपूर टेस्टच्या पाचव्या आणि शेवटच्या दिवशी इंग्लंडच्या बॅट्समननं संथ बॅटिंग करत दिवस खेळून काढला.

दुसर्‍या इनिंगमध्ये इंग्लंडनं 4 विकेट गमावत 352 रन्स केले. जोनाथन ट्रॉटनं 143 रन्सची खेळी केली, तर इयान बेलनंही 116 रन्स केले. भारतीय बॉलर्सना मात्र दिवसभरात केवळ 1 विकेट घेण्यात यश आलं. पहिली अहमदाबाद टेस्ट मॅच जिंकणार्‍या भारतीय टीमनं पुढच्या तीनही टेस्ट मॅचमध्ये सुमार कामगिरीचं प्रदर्शन केलं. भारताचे दिग्गज बॅट्समन फ्लॉप झालेच, पण भारतीय बॉलर्सही या सीरिजमध्ये अपयशी ठरले. इंग्लंड दौर्‍यातल्या मानहानीकारक पराभवाचा वचपा काढण्याची संधी भारतीय टीमला होती. पण भारतीय टीमनं ही संधी तर गमावलीच पण पुन्हा एकदा मानहानीकारक पराभवही स्विकारला. 28 वर्षानंतर मायदेशात सीरिज गमावण्यीच वेळ भारतीय टीमवर आली. याआधी 1984 मध्ये सुनील गावसकर यांच्या नेतृत्वाखालील भारतीय टीमला मायदेशातच 5 टेस्ट मॅचच्या सीरिजमध्ये 2-1 असा पराभव पत्करावा लागला होता. यानंतर 2006मध्ये इंग्लंडनं भारत दौर्‍यात टेस्ट सीरिज ड्रॉ केली होती आणि आता 2012 मध्ये महेंद्रसिंग धोणीच्या टीमला पुन्हा एकदा टेस्ट सीरिजमध्ये 2-1 असा पराभव स्विकारावा लागला.

भारत दौर्‍यात इंग्लंडचे खेळाडू चमकत असतानाच भारताचे दिग्गज खेळाडू मात्र सपशेल फ्लॉप ठरले. रन्स करण्याच्या बाबातीत भारताचा स्पीन बॉलर आर अश्विनही सीनिअर खेळाडूंच्या पुढे आहे. आपण एक नजर टाकूया भारताच्या सीनिअर खेळाडूंच्या फ्लॉप कामगिरीवर…

भारताचे दिग्गज 'फ्लॉप'

वीरेंद्र सेहवागमॅच -4 रन्स -253 बेस्ट – 117

गौतम गंभीरमॅच -4 रन्स -251 बेस्ट – 65

सचिन तेंडुलकरमॅच -4 रन्स -112 बेस्ट – 76

एम एस धोणीमॅच -4 रन्स -197 बेस्ट – 99

close