तरूणाईचा राष्ट्रपतीभवनावर हल्लाबोल

December 22, 2012 9:39 AM0 commentsViews: 3

14 डिसेंबर

दिल्लीत झालेल्या सामूहिक बलात्काराच्या निषेधार्थ आज दिल्लीत संतापाचा उद्रेक झाला. इंडिया गेटपासून सुरू झालेली निदर्शनं राजपथावरून प्रवास करत.. जाऊन थडकली थेट राष्ट्रपती भवनाच्या दारावर. आजूबाजूला संसद, पंतप्रधान कार्यालय आणि गृहमंत्रालय असल्यामुळे या भागात निदर्शनांना परवानगी नाकारण्यात आली होती. म्हणून पोलिसांनी तरूण निदर्शकांवर लाठीचार्ज केला. त्यांच्यावर अश्रुधूराच्या कांड्या फोडण्यात आल्या. तसंच पाणीही मारण्यात आलं. आत्ता दुपारीसुद्धा शेकडो निदर्शक संपूर्ण राजपथावर जमले आहे. दिल्लीतल्या आणि देशातल्या महिलांच्या सुरक्षेच्या बाबतीत कडक पावलं उचला, अशी मागणी निदर्शकांनी केली. विरोधकांनी या लाठीचार्जवर जोरदार टीका केलीये.

close