नाशिकमध्ये विद्यार्थीनीवर सामूहिक बलात्कार

December 27, 2012 9:45 AM0 commentsViews: 8

27 डिसेंबर

दिल्लीत सामूहिक बलात्कार प्रकरणी आंदोलनाचे वादळ शांत होत नाही तोच महाराष्ट्रात नाशिक जिल्ह्यात शासकीय आश्रमशाळेतील विद्यार्थीनीवर बलात्कार झाल्याची घटना घडली आहे. सुरगाणा तालुक्यातील पळसन येथील आश्रमशाळेत हा खळबळजणक प्रकार घडलाय. पीडित मुलीच्या पालकांनी सुरगाणा पोलिसांत तक्रार दाखल केलीय. या प्रकरणी चार नराधामांना अटक करण्यात आली आहे. पीडित विद्यार्थीनी 12 वीच्या वर्गात शिकते. पीडित मुलीला उपचारासाठी सुरगाणा ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. विषेश म्हणजे रविवारी झालेली हि घटना आदिवासी विकास प्रकल्प अधिकार्‍यांकडून दडपण्याचा प्रयत्न होतोय. ह्या प्रकरणाची वाच्यता न करण्याबाबत मुलींच्या पालकांना धमकावण्यात आल्याचं पुढं आलंय.

close