26/11 चा मास्टरमाईंडला अटक करण्यास पाक सरकारची असमर्थता

December 14, 2012 5:23 PM0 commentsViews: 6

14 डिसेंबर

26/11 मुंबई हल्ल्याचा मास्टरमाईंड हाफिझ सईद याला अटक करण्यात पाकिस्ताननं पुन्हा एकदा असमर्थता दाखवली आहे. हाफिझला अटक करण्यासाठी भारतानं जे पुरावे दिलेत ते अपुरे असल्याचं पाकिस्तानचे गृहमंत्री रहमान मलिक यांचं म्हणणंय. मलिक आज संध्याकाळी भारत भेटीवर आलेत. ते भारताचे गृहमंत्री सुशील कुमार शिंदे यांचीे भेट घेणार आहेत. या भेटीत 26/11 हल्ल्याचा पाकिस्तानच्या कोर्टात सुरू असलेल्या खटल्याबाबतही या भेटीत चर्चा होण्याची शक्यता आहे. दरम्यान, भारत-पाकिस्तानदरम्यान झालेल्या नव्या व्हिसा कराराची अंमलबजावणी हा या भेटीचा उद्देश आहे. दोन्ही देशात संपर्क आणि व्यापार वाढीच्या दृष्टीनं गेल्या सप्टेंबरमध्ये नवा व्हिसा करार करण्यात आला.

close