काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्यावर बनला सिनेमा

December 4, 2008 8:57 AM0 commentsViews: 5

4 डिसेंबर, मुंबईमोहम्मद तारिकआपण आतापर्यंत राजकीय हस्तींवर बरेच सिनेमे झाले आहेत. आणि ते गाजलेही. आता काँग्रेसच्या अध्यक्ष सोनिया गांधीं यांच्यावर सिनेमा बनत आहे. सोनियांचा आतापर्यंतचा प्रवास नाट्यमय प्रवास यात चित्तारला आहे. दिग्दर्शक कुमार किरण हा सिनेमा घेऊन येतायत. मुंबई हाय कोर्टाच्या परवानगीनं दिग्दर्शक कुमार किरण हा सिनेमा करताहेत.सोनिया गांधीं आपल्यासमोर येणार आहेत वेगळ्या रूपात.जगमोहन मुंडाही सोनियांवर सिनेमा बनवणार होते. पण आता कुमार किरणचा सिनेमा सेन्सॉर बोर्डानंही पास केलाये. सिनेमाचं नाव आहे सोनिया. यात सोनिया गांधीबरोबर इंदिरा गांधी, राजीव गांधी आणि सोनिया गांधी-राजीव गांधी यांची प्रेमकथाही सिनेमात पाहायला मिळेल.सिनेमात राजकीय घटनाही आहेत. त्यात इंदिरा गांधींचा मृत्यूही आहे.भरपूर रिसर्च केल्याचं दिग्दर्शकाचं म्हणणं आहे. सोनियाची भूमिका पुरवा पराग, राजीव गांधींची भूमिका समीर अली तर इंदिरा गांधीची भूमिका आशा शर्मांनी वठवली आहे.सिनेमाची सुरुवात झाली ती 2004 मध्ये आणि तो 2005मध्ये पूर्णही झाला होता. पण गेली तीन वर्ष तो सेन्सॉरच्या कात्रीत अडकला होता. हिंदी आणि इंग्लिश दोन भाषेत सिनेमा आता लवकरच देशभरात प्रदर्शित होईल.

close