दिल्ली गँगरेप : पीडित मुलीवर सिंगापूरमध्ये उपचार सुरू

December 27, 2012 9:57 AM0 commentsViews: 7

27 डिसेंबर

दिल्ली सामूहिक बलात्कार प्रकरणातल्या पीडित मुलीवर सिंगापूरच्या माऊँट एलिझाबेथ हॉस्पिटलमध्ये उपाचार सुरू झाले आहे. काल रात्री पीडित मुलीला एअर ऍम्ब्युलन्सने सिंगापूरला नेण्यात आलं. सफदरजंग हॉस्पिटलमध्ये तिच्यावर उपचार करणारे डॉक्टर आणि मुलीचे आई-वडीलही सिंगापूरमध्ये तिच्यासोबत आहेत. या उपचारासाठी लागणारा सगळा खर्च केंद्र सरकार उचलणार आहे. सध्या या मुलीची प्रकृती स्थिर असल्याचं सांगण्यात येतंय.

close