आमच्या कार्यकर्त्यांना फसवलं जातंय -केजरीवाल

December 25, 2012 11:46 AM0 commentsViews: 3

25 डिसेंबर

दिल्लीत झालेल्या सामूहिक बलात्काराविरूद्ध झालेल्या आंदोलनादरम्यान एका कॉन्सस्टेबल मृत्यू सरकार तरूणांना खोट्या गुन्ह्यात अडकवत असल्याचा आरोप आम आदमी पक्षाचे समन्वयक अरविंद केजरीवाल यांनी केला. कॉन्सस्टेबलच्या मृत्यूप्रकरणात चौकशी करण्यात यावी आणि त्यात आम आदमी पार्टीचा कुणीही दोषी असल्यास तर त्यालाही शिक्षा करा असंही केजरीवाल यांनी स्पष्ट केलंय. दिल्लीत रविवारी इंडिया गेटवर झालेल्या आंदोलनादरम्यान दगडफेकीत जखमी झालेल्या पोलीस कॉन्स्टेबल सुभाष तोमर यांचा मृत्यू झालाय. राम मनोहर लोहिया हॉस्पिटलमध्ये उपचारादरम्यान त्यांच्या मृत्यू झालाय. याप्रकरणी 8 जणांना अटक करण्यात आली होती. पण त्यांची जामिनावर सुटका करण्यात आली. त्यांच्यापैकी एक जण आम आदमी पार्टीचा कार्यकर्ता आहे. मनिष सिसोदिया यांनी त्याला जामिनासाठी मदत केली आहे.

close