’26/11 आणि बाबरी मशीद प्रकरण सारखेच’

December 15, 2012 9:47 AM0 commentsViews: 22

15 डिसेंबर

पाकिस्तानचे अंतर्गत गृहमंत्री रहमान मलिक सध्या भारत भेटीवर आहेत पण त्यांची ही भेट वादग्रस्त ठरली. त्यांनी मुंबईवर झालेल्या 26/11 च्या दहशतवादी हल्ल्या आणि बाबरी मशिदीचा पाडाव या दोन वेगवेगळ्या घटनाची तुलना करून अकलेचे तारे तोडले आहे. यामुळे वाद निर्माण झालाय. त्यांच्या या वादावर भाजप आणि शिवसेनेनं संताप व्यक्त केलाय. सरकार या प्रकरणी गप्प का ? असा सवाल भाजपनं विचारला आहे. मलिक यांनी आज सकाळी पंतप्रधान मनमोहन सिंग यांची भेट घेतली. दरम्यान, मलिक यांनी आपल्या वक्तव्याचा चुकीचा अर्थ लावला गेल्याचं म्हटलं आहे.

पाकचे गृहमंत्री रहमान मलिक काल शुक्रवारी भारतात दाखल झाले. यावेळी त्यांनी 26/11 मुंबई हल्ल्याचा मास्टरमाईंड हाफिझ सईदला अटक करण्यासाठी भारतानं जे पुरावे दिलेत ते अपुरे असल्याचं पाकिस्तानचे गृहमंत्री रहमान मलिक यांचं म्हणणंय. मलिक आज भारताचे गृहमंत्री सुशील कुमार शिंदे यांचीे भेट घेणार आहेत. या भेटीत 26/11 हल्ल्याचा पाकिस्तानच्या कोर्टात सुरू असलेल्या खटल्याबाबतही या भेटीत चर्चा होण्याची शक्यता आहे. दरम्यान, भारत-पाकिस्तानदरम्यान झालेल्या नव्या व्हिसा कराराची अंमलबजावणी हा या भेटीचा उद्देश आहे. दोन्ही देशात संपर्क आणि व्यापार वाढीच्या दृष्टीनं गेल्या सप्टेंबरमध्ये नवा व्हिसा करार करण्यात आला.

close