दिल्लीत 42 वर्षीय महिलेवर सामूहिक बलात्कार

December 27, 2012 10:09 AM0 commentsViews: 3

27 डिसेंबर

दिल्लीत सामूहिक बलात्कार घटनेचे पडसाद देशभरात उमटले. या आंदोलनाचा वणवा शांत होत नाही तोच पुन्हा एकदा दिल्लीला हादरा बसला आहे. राजधानी दिल्लीत एका 42 वर्षीय महिलेवर सामूहिक बलात्कार झाल्याची घटना घडली आहे. जयपूरहून दिल्लीत आलेल्या 42 वर्षांच्या महिलेवर तिघांनी बलात्कार केला. पोलिसांनी या संदर्भात रात्री उशिरा गुन्हा दाखल केला असून आरोपींचा शोध घेतला जात आहे. पीडित महिलेनं पोलिसांकडे दिलेल्या जबानीत तिच्याच एक परिचित व्यक्तीने त्याच्या दोन साथीदारांसह बलात्कार केला. बलात्कार केल्यानंतर या महिलेकडील पैसे लुटण्यात आले आणि तिला कालकाजी परिसरात फेकून दिलं. पीडित महिलेनं आपल्या मैत्रिणाला फोन करून बोलावून घेतलं. त्यानंतर या महिलेनं थेट पोलीस स्टेशन गाठून तक्रार दाखल केली.

close