मुख्यमंत्री निवडीचे सर्वाधिकार सोनियांना

December 4, 2008 11:29 AM0 commentsViews: 1

3 डिसेंबर, मुंबईराज्याचा नवा मुख्यमंत्री निवडण्याचे सर्वाधिकार काँग्रेस पक्षाध्यक्षा सोनिया गांधी यांना देण्यात आले आहेत. विलासराव देशमुख यांचाराजीनामा हायकमांडने मंजूर केल्यानंतर नव्या नेत्याची निवड करण्यासाठी काँग्रेसनं तातडीनं केंद्रीय निरीक्षक पाठवले. केंद्रीय संरक्षण मंत्री ए.के.अँटोनी आणि परराष्ट्र मंत्री प्रणव मुखर्जी हे केंद्रीय निरीक्षक म्हणून मुंबईत आले. विधानभवनात झालेल्या विशेष बैठकीत नेता निवडीचेसर्वाधिकार काँग्रेस पक्षाध्यक्ष सोनिया गांधी यांना द्यावे, असा ठराव विलासराव देशमुख यांनी मांडला. या ठरावाला पतंगराव कदम यांनी अनुमोदनदिलं. हा ठराव बहुमतानं संमत झाला. त्यामुळे राज्याचा नवा मुख्यमंत्री कोण असेल, या प्रश्नाचं उत्तर आता काँग्रेस हायकमांडकडूनच मिळणार आहे.

close