मोदींच्या शपथविधीला राज ठाकरे राहणार उपस्थित

December 25, 2012 1:12 PM0 commentsViews: 61

25 डिसेंबर

मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचं गुजरात प्रेम सर्वश्रुत आहे. याच प्रेमापोटी राज ठाकरे यांनी गुजरात दौरा करून नरेंद्र मोदींवर स्तुतीसुमन उधळली होती. मागिल आठवड्यात गुजरात विधानसभेचा निकाल जाहीर झाला आणि नरेंद्र मोदी यांनी विजयी हॅटट्रिक साधलीय. उद्या अहमदाबादमध्ये नरेंद्र मोदी तिसर्‍यांदा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहे या शपथविधीला राज ठाकरे उपस्थित राहणार आहेत. आता राज ठाकरे शपथविधीला जाणार असल्यामुळे पुन्हा एकदा राजकीय मैत्रीची चर्चा सुरू झालीय. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनानंतर राज ठाकरे पहिल्यांदाच कोणत्यातरी कार्यक्रमाला हजेरी लावणार आहे. विशेष म्हणजे नरेंद्र मोदी विजयी झाल्यानंतर शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी पहिलं अभिनंदन केलं होतं. आता राज ठाकरे स्वत:शपथविधीला हजेरी राहून मैत्रीचा 'फर्ज अदा' करणार आहे.

close