तिलारी धरणावर 6 दिवसांपासून प्रकल्पग्रस्तांचं आंदोलन सुरूच

December 15, 2012 10:02 AM0 commentsViews: 2

15 डिसेंबर

सिंधुदुर्गातल्या तिलारी धरणावर गेल्या सहा दिवसांपासून प्रकल्पग्रस्तांचं आंदोलन सुरूच आहे. त्यांच्या आंदोलनाची अजून सरकारनं दखल घेतलेली नाही. गेल्या 30 वर्षांपासून असलेल्या मागण्या जोपर्यंत पूर्ण होणार नाहीत तोपर्यंत कालव्यातून हटणार नाही तसंच गोव्याला पाणी सोडू देणार नाही असा इशारा या प्रकल्पग्रस्तांनी दिला आहे. तिलारी धरणप्रकल्प हा गोवा आणि महाराष्ट्राचा संयुक्त प्रकल्प आहे. काही प्रकल्पग्रस्तांचं पुनर्वसन गोव्यातही झालंय. पण प्रकल्पग्रस्तांना नोकरीत सामावून घेण्याचं सरकारनं 20 वर्षांपूर्वी दिलेलं आश्वासन अजूनही पूर्ण झालं नाही. यामुळे हे धरणग्रस्त संतापलेत. आपल्या गाई गुरांसह प्रकल्पग्रस्तांनी कालव्यातच आपला संसार मांडलाय. जोपर्यंत या बाबतीत लेखी आश्वासन मिळत नाही तोपर्यंत हे आंदोलन सुरुच रहाणार असल्याचं धरणग्रस्तांच्या समितीकडून स्पष्ट करण्यात आलंय.

close