नरेंद्र मोदीच 2014 मध्ये पंतप्रधान होणार -सोमय्या

December 20, 2012 1:04 PM0 commentsViews: 5

20 डिसेंबर

नरेंद्र मोदी यांना गुजरातमध्ये तिसर्‍यांदा स्पष्ट बहुमत मिळालाय. मोदींच्या या विजयाचा जल्लोष मुंबईतही साजरा केला जातोय. भाजपच्या मुंबईतील कार्यालयाबाहेर कार्यकर्त्यांनी ढोलताशांच्या गजर करत आसमंत दणाणून सोडलं. एकमेकांना पेढे भरवत विजयाचा आनंद साजरा केला. कार्यकर्त्यांसोबत आमदार किरीट सोमय्या यांच्यासह राज पुरोहित यांनीही ताल धरत आनंद साजरा केलाय. तर नरेंद्र मोदीच हेच 2014 मध्ये भारताचे पंतप्रधान होणार असा दावाही सोमय्या यांनी केलाय.

close