मेणबत्त्या मिरवणं फक्त फॅशनसाठीच -राष्ट्रपतीपुत्र

December 27, 2012 11:37 AM0 commentsViews: 3

27 डिसेंबर

दिल्लीत झालेल्या सामूहिक बलात्कार प्रकरणी देशभरात एकच संतापाचा वणवा पेटलेला असताना यात राष्ट्रपतीपुत्राने तेल ओतले आहे.काँग्रेसचे खासदार आणि राष्ट्रपतीचे चिंरजीव अभिजीत मुखर्जी यांनी इंडिया गेटवर झालेल्या आंदोलकांबाबत आंदोलक तरूणाईची चेष्टा केलीय. अभिजित मुखर्जी म्हणतात, दिल्लीत जे काही घडले ते इजिप्तमधील गुलाबी क्रांती सारखं आहे ज्याचा झालेल्या घटनेशी काही एक संबंध नाही. भारतात मेणबत्ती मोर्चा काढणे ही फॅशन झाली. ही लोकं मोर्चा काढणारे आणि रात्री पबमध्ये जातात अशी टीका अभिजित मुखर्जी यांनी केली. ते एवढ्यावरच थांबले नाही. ते म्हणाले, मी सुद्धा विद्यार्थी आयुष्य जगलोय, मला माहित आहे या वयात विद्यार्थी कसे असतात. ज्या मुली टीव्हीवर मेकअपकरून इंटरव्हू देत आहे त्या काही विद्याथीर्ंनी नाही. पण आपल्याकडून झालेल्या चुकीची त्याना लवकर जाणीव झाली आणि माझ्या वक्तव्यामुळे कुणी दुखावलं गेलं असेल, तर मी माझं वक्तव्य मागे घेतो पण आपण आपल्या मतावर ठाम आहोत, असंही अभिजित मुखर्जी यांनी म्हटलं. अभिजीत मुखर्जी यांच्या या वक्तव्यानंतर त्यांनी आंदोलकांची माफी मागावी, अशी मागणी देशभरातून करण्यात येतेय. प्रणव मुखर्जी यांची मुलगी आणि अभिजीतची बहीण शर्मिष्ठा मुखर्जी यांनी मात्र, भावाने केलेल्या या मतप्रदर्शनाबद्दल असहमती दाखवलीय आणि जनतेची माफी मागितलीय.

close