पुण्यात घरात घुसून दाम्पत्याची निर्घृण हत्या

December 25, 2012 2:01 PM0 commentsViews: 4

25 डिसेंबर

पुण्यातील वारजे भागात एका सोसायटीमध्ये घरात घुसून पती आणि पत्नीचा खून करण्यात आल्याची घटना घडलीये. चोरीच्या उद्देशानं हे खून करण्यात आल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केलाय. स्टर्लिंग अपार्टमेटमध्ये राहणार्‍या कमलाकर रंजीरे आणि शिमला रंजीरे या दाम्पत्यांचा त्यांच्या राहत्या घरी गळा चिरुन खून करण्यात आलाय. त्यांच्या घरी दिल बहादूर आणि सनी लांबा ही दोन मुलं सुध्दा राहत होती. मात्र घटना घडल्यापासून हे दोन्ही मुलं तिथून फरार झाली आहेत. कमलाकर रंजीरे यांनी विकलेल्या फ्लॅटची रोख रक्कम घेऊन ही मुलं घटनास्थळावरून फरार झाली असावी असा पोलिसाचा प्राथमिक अंदाज आहे.

close